मूर्तीकाराकडून स्वतःला आकार प्राप्त करून घेणा-या श्रीगणेशाचे आज सकाळी नाशिकमध्ये घेतलेले हे ताजे छायाचित्र.
कष्टाशिवाय फळ नाही. कष्टाशिवाय सुख नाही. कष्टाशिवाय समाधान-शांती नाही. थोर माणसं तहानभूक विसरून आयुष्य झिजवतात; तेव्हा कुठे सुंदर संकल्पना, वैश्विक तत्त्वांची निर्मिती होते. देवाकडून माणूस घडतो की माणसांकडून देवाची संकल्पना उदयाला येते, असा कूट प्रश्न आहे.
तथापि.....माणसासमोर प्रकट होण्यासाठी देवाला देखील स्वतःला असे भाजून घ्यावे लागते. श्रीगणेशाची सुंदर मूर्ती आपल्यासमोर प्रकटण्यासाठी मानवाकडून अशा प्रकारे तावूनसुलाखून घेते.
“ Your God is ever beside you - indeed, He is even within you”- Alphonsus Liguori (An Italian writer)
No comments:
Post a Comment