रद्दीच्या पैशांचा चांगला विनियोग सुरू असतांना नाशिक शहरात रूदनने “सिंघम रिटर्न्स” सिनेमा दाखवण्याचा हट्ट धरला. मी दडपशाही करीत नसल्यामुळे बालहट्टापुढे सपशेल झुकलो आणि सिनेमागृहात मुलाला घेऊन गेलो. असे सिनेमे बघतांना मी घाबरून जातो. कानठळ्या बसणारे आवाज, घातपात, हाणामा-या, कधीही न ऐकलेले संवाद कानावर पडताच अंगावर काटा उठतो. अशावेळी गप्पगार बसून रहावे लागते. पण, रुदनने सिनेमाचा आनंद लुटला.
“सिंघम रिटर्न्स”मध्ये एक भोंदूबाबा दाखवला आहे. तो भाविकांचा गंडवतो-फसवतो-हत्या करतो. देशाशी देखील इमान राखत नाही. प्रामाणिक अधिका-यांना हा भोंदूबाबा त्रास देतो. रुदन या पात्राभोवती घुटमळत होता. “सिंघम रिटर्न्स” पाहून आम्ही घरी रिटर्न होतांना रुदन म्हणाला की, “ पप्पा, मला सिनेमा आवडला. पण सर्व साधूबाबा असेच फसवाफसवी करतात करतात का? बाबालोक चांगले नसतात का?”
मी म्हणालो, “नाही. सर्व बाबा मंडळी फसवत नाहीत. जगात चांगले साधूबाबा देखील होऊन गेलेत. अनेक बाबा लोकांनी आनंद मिळवून देण्यासाठी आयुष्य घालवले आहे. अशा बाबांची माहिती तू घ्यायला हवी.”
मला वाटले हा विषय इथेच संपेल. पण रुदन म्हणाला, “ होय पप्पा... ओशो देखील एक चांगले साधूबाबा होते. ते लोकांना लोकांचे डोळे उघडणारी माहिती सांगत. आणि पप्पा..बुध्द देखील वेगळे बाबा होते ना..? ते राजे असूनही जंगलात गेले. साध्या गोष्टींमधून बुध्दांनी लोकांना कसे वागावे ते सांगितले.”
रुदनच्या तोंडी ओशो आणि बुध्द ऐकून मी चकीत झालो. मोटरसायकलची गती कमी केली. सहावीतून अलिकडेच सातवीत गेलेला हा मुलगा ओशो आणि बुध्दांचा माहितगार असल्याचे समजताच माझी मती गुंग झाली. मी त्याचे अभिनंदन केले. मोठा झाल्यावर जगातील बाबांचा अभ्यास कर, असे सांगत मी भोंदूबाबाचा विषय तोडला. दहावी-बारावीच्या एक्झाम रुम ऐवजी ओशो-बुध्द तत्त्वज्ञानाच्या गुहेत मुलगा गेला तर पुढे उपाशी रहाण्याची वेळ येईल, अशी भीती मला वाटते. मुलाला मी अमीरखान-सलमानखान कधीही सांगितले नाही, तसेच ओशो-बुध्द देखील सांगितले नाहीत. मात्र, मुले चौकस असतात. ज्ञानाची,माहितीची,उत्सुकतेची भूक इतकी असते की तुम्ही बांध घालू शकत नाही. पालक दिशा दाखवू शकतो. मात्र, मुलाच्या व्यक्तिमत्त्वाचे जहाज बंदराला लागेल की हिमनगावर आदळेल, याची हमी नसते.
(मुलगा मोठा झाल्यानंतर आम्ही सर्व विषयांवर बोलणार आहोत. चार्वाक-बुध्द-व्यास-वाल्मिकी-टागोर-कालिदास-ओशो-अशोक-राम-कृष्ण असोत की कांट-हेगेल-रसेल-फ्राईड-सार्त्र-कामू-काफ्का तसेच जीए-आरतीप्रभू-ग्रेस असोत की सत्यजित रॉय-गुरूदत्त-गुलजार.. तूर्तास मला रोजीरोटी आणि रुदनला अभ्यास महत्त्वाचा आहे. मधल्या काळात सिंघमचा तिसरा भाग आल्यास आणि रुदनने ह़ट्ट धरल्यास सिंघम सिनेमा पुन्हा दाखवावा लागेल. नाईलाज आहे….यही तो खुबसुरत जिंदगी है ना..!)

No comments:
Post a Comment