🌷सह्याद्रीचे विचारपुष्प ९ :
" सह्याद्रीला यातना कमी नाहीत. लोक कुऱ्हाड चालवतात. आगी लावतात. वणवे पेटतात. उन्हाळा भाजून काढतो. पण, माझा सह्याद्री सुडाने पेटत नाही. तो कुणाचा तिरस्कार, क्रोध करीत नाही.पहिल्याच पावसानंतर सह्याद्री सारी दुःख विसरून आपल्या माळरानावर पुन्हा हिरवाई आणण्यासाठी स्वतःला गुंतवून घेतो. हे झुडप बघा पहिल्याच पावसानंतर कसे ठाम उभे राहिले आहे.
माझ्याही मनात एक माळरान आहे. त्यासाठी जगाला दोष न देता या माळरानाचे नंदनवन करण्यासाठी परिश्रम घेईल. माळरान वाढू न देता तेथे मी आनंदाचे बी रुजवेन. त्याला चैतन्याची कोमल पालवी आणेन. या पालवीत मग विवेकाचे पक्षी गाणे गातील. निर्मळ व्यवहाराच्या काडीने हृदयी आत्मानंदाचा एक खोपा गुंफेल. आणि, त्याकरिताच या अनमोल सह्य सृष्टीच्या सतत सान्निध्यात राहीन."
🏞️⛺🪢🦚🕊️🕊️🕊️
No comments:
Post a Comment