जगणं हे सुंदर आहे. अर्थात ते जगणं नैसर्गिक हवं. निसर्गाशी ते अधिकाधिक जवळीक साधणारं हवं. ही जवळीक जितकी कमी तशा जगण्यातील समस्या विस्तारतात. समस्यांच्याही या गर्तेत काही माणसं सुंदर जगतात आणि जग सुंदर करू पहातात. मी अशा लोकांचा शोध घेऊ पहातोय. याशिवाय, जे मनात आहे ते शब्दात उतरवण्याची संधी शोधतोय. ही संधी मला इथे मिळते.
Sunday, 11 December 2022
Sahyadri सह्याद्रीची डायरी ता.११ डिसेंबर २०२२
Sahyadri सह्याद्रीची डायरी ता.११ डिसेंबर २०२२
सह्यादीच्या हा पर्वतरांगांमध्ये साजरा केला आजचा जागतिक पर्वतदिन. खूप भटकलो. पाने, फुले, पक्षी, काटे, दगडधोंडे, कडेकपारी, कीडेमुंग्या, प्राणी, झरे, नद्या, ओढे आणि सह्याद्रीच्या रानातील माणसं या सर्वांशी खूप मनमोकळ्या गप्पा झाल्या..!
Thursday, 8 December 2022
सह्याद्रीची डायरी ता.७ डिसेंबर २०२२
सकाळ झाली तरी पर्वतरांगा आणि तळे निजलेलेच होते. सूर्यकिरण पूर्वेला क्षितिजावर हळुवारपणे रंगकाम करीत होते. पहाटेचा गार वारा अजूनही झोंबत होता. ती प्रसन्न प्रभात नाजूकपणे पुढे सरकत होती..!
🦚🦚🦚🦚🌹🦢🌹🦚🦚🦚🦚
सह्याद्रीची डायरी ता.८ डिसेंबर २०२२
स्वतः उपाशी राहून शतकानुशतके मानवाचं पोट भरत आलेल्या बैलाच्या नशिबी काय असते? बैलगाडी पाठोपाठ आता पुढील काही दशकात मुलांना बैल केवळ पुस्तकी चित्रात दाखवावे लागतील. मानवजातीच्या समृद्धीसाठी खरा झटला तो बैलच..!
🦚🦚🦚🦚🌹🦢🌹🦚🦚🦚🦚
दोन इमानी प्राणी : एक प्रामाणिक कष्टकरी आणि दुसरा निष्ठावंत रखवालदार. सह्याद्रीच्या कुशीत भटकंती करताना यापैकी कोणीतरी एक भेटले की मला आनंद होतो. जोडीने भेटले तर परमानंद..!
🦚🦚🦚🦚🌹🦢🌹🦚🦚🦚🦚
सह्याद्रीच्या कुशीत आमचा आवडता मेवा तयार होतो आहे. करवंद म्हणजे डोंगर भटक्यांची संजीवनी..!
🦚🦚🦚🦚🌹🦢🌹🦚🦚🦚🦚
सह्याद्रीच्या रानातील माणसं : भल्या सकाळी देवपूजा करीत रानात गवत कापण्यासाठी काठी टेकत बाबा निघालेले डोंगराकडे आहेत. देव आणि कष्टावर त्यांची समसमान श्रध्दा होती..!
🦚🦚🦚🦚🌹🦢🌹🦚🦚🦚🦚
Monday, 5 December 2022
सह्याद्रीची डायरी ता.६ डिसेंबर २०२२
सह्याद्री पर्वतरांगेतील माता अंजनीचे काल दर्शन घेतले. पर्वतावर रुईचे सुंदर फूल बहरले होते..!
🦚🦚🦚🦚🌹🦚🦚🦚🦚
वणवा पेटून पर्वत भाजून निघालेला होता. मात्र, पर्वताला पुनरुज्जीवनाची आस होती. दिशा उजळून टाकणारा सूर्य त्या जखमी पर्वताला नवी उमेद मिळवून देत होता..!
श्रीमंती किचन
सह्याद्रीच्या कुशीतील शेतकऱ्याच्या घरात श्रीमंती किचन किंवा झगझगीत दिवेही नसतात; पण माया, समाधान, शांतता असते. या मावशींनी भल्या सकाळी गोठा साफ केला. धारा काढल्या. मग आदराने मला चुलीवरचा चहा करून दिला..!
भावंडांची मस्ती
आज भटकंतीत मित्रांसोबत होतो. दोघे भाऊ कडाडून भांडत होते. आई-बाबा उत्सुकतेने त्या भावंडांची मस्ती पहात होते. त्यांनी हस्तक्षेप केला नाही. शेवटी दोघा भांडखोरांना शेंगदाणे देत ही कुस्ती मी कशीबशी सोडवली..!
Sunday, 4 December 2022
वासुदेव
आज घरी वासुदेव आले होते. ते मूळचे बुलढाण्याचे. "उदरनिर्वाहासाठी परंपरागत व्यवसाय जपतो आहे. वडिलांच्याच या चिपळ्या मी आज वापरतो आहे," असे ते आनंदाने सांगत होते. वासुदेव मंडळींना समाजप्रबोधनाचा वारसा आहे. गीतेचे तत्वज्ञान सोप्या भाषेत गावागावात प्रथम वासुदेवांनी पोहोवले..!
शेती का परवडत नाही ?
बेभरवशाची शेती करण्यापेक्षा लिंबूपाणी विकून चार पैसे हमखास पदरात पडतात. त्यामुळे मी शेती न करता पर्यटकांना दिवसभर लिंबूपाणी, चहा, बिस्किटे विकते. त्यातून संसार चांगला चालतो आहे. शेतीवर आमचा विश्वास नाही." भटकंतीत या शेतकरी ताईंनी हे धक्कादायक वास्तव सांगितले. कृषीप्रधान देशात शेती का परवडत नाही, असा प्रश्न अनुत्तरित आहे. दुर्दैवाने हे विदारक चित्र ७५ वर्षात कोणालाही बदलता आलेले नाही. "
Subscribe to:
Posts (Atom)