Thursday, 8 December 2022

सह्याद्रीची डायरी ता.८ डिसेंबर २०२२


स्वतः उपाशी राहून शतकानुशतके मानवाचं पोट भरत आलेल्या बैलाच्या नशिबी काय असते? बैलगाडी पाठोपाठ आता पुढील काही दशकात मुलांना बैल केवळ पुस्तकी चित्रात दाखवावे लागतील. मानवजातीच्या समृद्धीसाठी खरा झटला तो बैलच..!

🦚🦚🦚🦚🌹🦢🌹🦚🦚🦚🦚
दोन इमानी प्राणी :  एक प्रामाणिक कष्टकरी आणि दुसरा  निष्ठावंत रखवालदार. सह्याद्रीच्या कुशीत भटकंती करताना यापैकी कोणीतरी एक भेटले की मला आनंद होतो. जोडीने भेटले तर परमानंद..!

🦚🦚🦚🦚🌹🦢🌹🦚🦚🦚🦚



सह्याद्रीच्या कुशीत आमचा आवडता मेवा तयार होतो आहे. करवंद म्हणजे डोंगर भटक्यांची संजीवनी..!
🦚🦚🦚🦚🌹🦢🌹🦚🦚🦚🦚

सह्याद्रीच्या रानातील माणसं :  भल्या सकाळी देवपूजा करीत रानात गवत कापण्यासाठी काठी टेकत बाबा निघालेले डोंगराकडे आहेत. देव आणि कष्टावर त्यांची समसमान श्रध्दा होती..!
🦚🦚🦚🦚🌹🦢🌹🦚🦚🦚🦚


निळ्या आभाळावरील एक काटेरी नक्षी..!

🦚🦚🦚🦚🌹🦢🌹🦚🦚🦚🦚

No comments:

Post a Comment