माणसातील अहम् (इगो) हा अनेक माणसासाठी
अंगांनी कार्य करतो. वास्तवता, बुध्दी, चेतना, तर्क-शक्ती, निर्णय शक्ती, इच्छा
शक्ती, अनुकूलता, आकलन, भेदाभेद करण्याची वृत्ती या सर्वांना विकसित करतो. इगो हा
मानवाप्रमाणे प्राण्यातही असतो. तथापि, इगोची कार्ये प्राण्यांमध्ये मर्यादित पातळीवर
असावित किंवा इगोवर त्यांचे नियंत्रण असावे, असेही म्हणता येईल.
कारण, माणूस हा एकमेव असा आहे की इगोमुळे
तो स्वतःला, दुस-या माणसाला किंवा निसर्गाला किंवा त्याच्याशी जगण्याचा संबंध
नसलेल्या कोणत्याही जिवंत वा निश्चिल पदार्थाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.
उदा. माणूस केवळ गंमत म्हणून डोंगरावरच्या गवताला आग लावतो. उदा. इच्छा झाली
म्हणून तो निश्चिल असलेल्या डोंगरावरील दगड फोडतो किंवा गंमत म्हणून कडयावरून दगड
खाली ढकलतो.
प्राण्यांमध्ये किंवा सजीव सृष्टीत असे
काही नाही. प्राणी देखील स्वतःचे अधिवास,अन्न,परिवार याचे रक्षण करतात. मात्र, सहज
वाटले म्हणून कोणताही प्राणी दुस-या प्राण्याला इजा करीत नाही. अथवा, इच्छा झाली
म्हणून मानवी वसाहतीवर हल्ला करून मानवाला बंदी करण्याचा प्रय़त्न करीत नाही.
त्यामुळे वास्तवता, बुध्दी, चेतना, तर्क-शक्ती, निर्णय शक्ती, इच्छा शक्ती,
अनुकूलता, आकलन, भेदाभेद करण्याची वृत्ती अशी वृत्ती असलेला इगो प्राण्यांमध्ये
असूनही त्यांचा वापर स्वजातीची किंवा इतर जातीची हानी ते करीत नाहीत. इगोचा वापर सृष्टीशी
एकरूप होण्यासाठी प्राणी अधिक करीत असल्याचे आढळून येते. त्यामुळेच प्राणी हे
स्वार्थी नाहीत. जगण्यासाठी अत्यावश्यक असते ते मिळवण्याची वृत्ती आहे. मात्र,
स्वार्थ नाही.
स्वार्थ आणि इगोचा गैरवापर माणसात आत्यंतिक
आहे. म्हणून तो दुःखी आहे. सगळ्यात गमतीचा भाग म्हणजे दुःखावर मात करण्यासाठी
वापरले जाणारे उपाय देखील स्वार्थ आणि इगोचा गैरवापराआधारित असतात.
No comments:
Post a Comment